|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » विंडिजपुढे कांगारू बॅकफुटवर; शंभरीआधी अर्धा संघ माघारी

विंडिजपुढे कांगारू बॅकफुटवर; शंभरीआधी अर्धा संघ माघारी 

ऑनलाईन टीम / लंडन :

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफुटवर गेला असून, 17 व्या षटकातच त्यांची अवस्था 5 बाद 79 धावा अशी झाली.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विंडिजच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत झटपट 5 बळी घेतले. फिंच, वॉर्नर, ख्वाजा व मॅक्सवेल हे प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतले. वॉर्नर 3, तर फिंच केवळ सहा धावांवर बाद झाला. तर ख्वाजा व मॅक्सवेलने अनुक्रमे 13 व 0 धावा केल्या. कॉट्रेलने दोन, तर थॉमस व रसेलने प्रत्येकी एक बळी घेतला.

त्यानंतर स्मिथ व स्टॉयनिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, होल्डरने स्टॉयनिसचा अडसर दूर केला. तो 19 धावांवर बाद झाला. त्यामुळे तगडय़ा कांगारूंच्या पहिल्या फळीने विंडिजसमोर नांगी टाकल्याचे दिसून आले.