|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » Top News » राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिलेल्या राजीनाम्याच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळण्याची शक्यता आहे. राहुल यांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आता संपवली पाहिजे, असे वक्तव्य पक्षाचे ज्ये÷ नेते वीरप्पा मोईली यांनी केले आहे.

राहुल यांच्या राजीनाम्याच्या पवित्र्यांमुळे देशातील विविध राज्यांमधील प्रदेश काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाले आहेत. काँग्रेसमधील ही कोंडी फोडण्यासाठी पक्षाचे ज्ये÷ नेते वीरप्पा मोईली यांनी पुढाकार घेतला आहे. राहुल यांनी अध्यक्षपदावर कायम राहून देशातील प्रदेश काँग्रेसमध्ये निर्माण झालेले कलह मिटवावेत, असे पक्षातील वरि÷ नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची ही वेळ नाही. इंदिरा गांधी यांना देखील 1977 मध्ये अशाच राजकीय स्थितीचा सामना करावा लागला होता. परंतु, त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता, असेही मोईली यांनी इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.

Related posts: