|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच अमित शहांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता  

महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच अमित शहांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता   

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शिवसेनेतमध्ये अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. अमित शाहांच्या बैठकीतील मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यावरुन शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी मिळाली आहे. याआधी चंद्रकांत पाटलांनी युतीच्या फॉर्म्युल्यावर केलेल्या वक्तव्यानेही शिवसेनेत नाराजी होती.

भाजपच्या कोअर कमिटीची काल रविवारी दिल्लीत बैठक झाली. राज्यात होणाऱया आगामी विधानसभा निवडणुकीवर यावेळी मंथन करण्यात आले. विधानसभेसाठी शिवसेनेसोबत युती राहणार आहे, मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच हवा असे वक्तव्य अमित शाहांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत विधानसभेला युती ही होणारच आहे. लोकसभेला मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी काम केले. तसेच विधानसभेला भाजपचा मुख्यमंत्री बनण्यासाठी करायचे आहे. केवळ आपल्याच जागांवर नव्हे तर मित्रपक्षाच्या ही जागा निवडून आणण्यासाठी तितकीच मेहनत करा, अशा सूचना अमित शाहांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याची माहिती आहे.