|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वस्त्राsद्योग महामंडळाच्या संचालकपदी संजय भगत

वस्त्राsद्योग महामंडळाच्या संचालकपदी संजय भगत 

प्रतिनिधी/ वडूज

महाराष्ट्र शासनाच्या हातमाग (वस्त्राsद्योग) महामंडळाच्या संचालकपदी रयत क्रांती संघटनेचे राज्य कोर कमिटी सदस्य संजय भगत यांची नियुक्ती झाली आहे                   

सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नातून व शिफारशीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संमतीने संजय भगत यांची महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती केली   

ऊस आंदोलन, दुष्काळी पाणी प्रश्नावर कायम लढा, जिहे – कटापूर, वसना-वांगना, उरमोडी, टेंभू अशा पाणी योजनांबाबत तीव्र आंदोलन संजय भगत यांनी केले. परिणामी बऱयाच वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

त्यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार नरेंद्र पाटील, सुनील काटकर, दिलीप येळगावकर, माजी आमदार मदन भोसले, अतुल भोसले, आमदार जयकुमार गोरे, महेश शिंदे, रणजीत भोसले, चेतना सिन्हा, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, उत्तमतात्या शिंदे, रणधीर जाधव, किरण बर्गे, तात्यासाहेब डेरे, माजी सभापती सुरेश जाधव, मानाजी घाडगे, राहुल पाटील, भरत मुळे, आमीन आगा, राजेंद्र जगताप, गणेश भोसले, बाळासाहेब बर्गे, अनंत माने, मुसद आंबेकरी, राजेंद्र लोहार मधुकर जाधव, विठ्ठल विरकर, प्रकाश साबळे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.