|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » मी निवडणूक लढवायची की नाही ते पक्षप्रमुख ठरवतील : आदित्य ठाकरे

मी निवडणूक लढवायची की नाही ते पक्षप्रमुख ठरवतील : आदित्य ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मी निवडणूक लढवावी की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे आणि पक्षाचे नेते घेतील, असे सूचक विधान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. वरळी आणि माहिम विधनसभा मतदार संघातील युवासेना पदाधिकारी आणि आदित्य ठाकरेंची काल सोमवारी बैठक झाली. या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी विधनसभा निवडणूक लढवण्याबाबत सूचक विधान केले आहे.  या बैठकीला शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि माहिमचे शिवसेना आमदार सदा सरवणकर, वरळीचे शिवसेना आमदार सुनील शिंदे उपस्थित होते. या बैठकीला आदित्य ठाकरेंनी माहिम आणि वरळी विधनसभा मतदार संघातील युवासेनेच्या पदाधिकाऱयांना लोकसभा निवडणुकीच्या मतांची तपशीलवार आकडेवारी घेऊन उपस्थित राहण्यास सांगितले होते. आगामी विधनसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पदाधिकारी-कार्यकर्त्यांना नवीन मतदार नोंदणीचे लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. तसेच माहिम आणि वरळी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला कुठल्या भागात मतदान कमी झाले आणि ते का? याचा अभ्यासही करण्याच्या सूचना आदित्य ठाकरेंनी बैठकीत दिल्या आहेत. या बैठकीत पावसाळी कामाचा आढावा देखील घेण्यात आला.