|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 10 लाख

संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 10 लाख 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 पापाची तिकटी येथे होणाऱया संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी 10 लाखांचा निधी दिला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्थनिक विकास निधीतून हा निधी देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱयांना यासंदर्भात दिलेले पत्र सोमवारी आमदार क्षीरसागर यांनी महापौर सरिता मोरे यांना देण्यात आले.

 महापालिकेच्या माध्यमातून पापाची तिकटी येथे संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. 43 लाखांचा निधी अपेक्षित असून महापालिकेनेही निधीची तरतूद केली आहे. याचबरोबर हिंदूत्ववादी संघटनाही लोकसहभागातून स्मारकाच्या कामात हातभार लावणार आहे. मागील महिन्यांत महापालिकेमध्ये स्मारकाच्या आराखडय़ासंदर्भात महापालिका पदाधिकारी, हिंदूत्ववादी संघटना, अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्मारकासाठी 10 निधी देण्याची घोषणा केली होती. महापालिकेने स्मारकाच्या कामासाठीची निविदा प्रसिद्ध केली आहे.

दोन्ही निधीची पत्रे आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापौर सरिता मोरे, आयुक्त मल्लिकनाथ कलशेट्टी, यांच्या कडे सुपूर्द केली. यासह तातडीने निधी वर्ग करून दोन्ही कामे तातडीने पूर्णत्वास नेण्याची मागणी केली. टर्न टेबल लॅडर खरेदी केला नसल्याने अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येत आहेत. त्यामुळे महापालिकेने उर्वरित रक्कम स्वनिधीतून तरतूद करून तातडीने अत्याधुनिक टर्नटेबल लॅडर खरेदी करावा, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते विलास वास्कर, शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, माजी महापौर सौ. हसीना फरास, नगरसेवक ईश्वर परमार, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते.

स्वर्गरथासाठी (शववाहिका) 15 लाख

कोल्हापूर महापालिकेकडील शववाहिकांची संख्या कमी आहे. शववाहिका नादुरुस्त असल्यामुळे बंद आहेत. काही शववाहिका मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे उपनगराबरोबर शहरातही वर्दी दिल्यानंतर शववाहिका वेळेत येत नाहीत. परिणामी नातेवाईकांवर ताटकळत थांबण्याची वेळ येते. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्वर्गरथासाठी (शववाहिका) 15 लाखांचा निधी दिला आहे. मराठवाडा-विदर्भ भागात अंत्ययात्रेकरीत स्वर्गरथाचा वापर करण्यात येतो. त्याच पद्धतीचे स्वर्गरथाची सुविधा कोल्हापूरवासियांना उपलब्ध व्हावी, या हेतूने आमदार राजेश क्षीरसागर यांनी निधी दिला आहे. यासंदर्भातील पत्रही महापौर सरिता मोरे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे दिले. 

 सेंट्रल किचनसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार

 राज्यात 2003 पासून शालेय पोषण आहार योजना सुरु आहे. महिला बचत गत व व्यक्तिगत स्वरुपात ठेका दिल्या जाणाया या योजनेत केंद्रीय किचन पद्धत अंमलात आणली जाणार असल्याने हजारो महिलांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. स्थानिक पातळीवर या योजनेतील अटी शिथिल करून या योजनेत महिला बचत गटांना सामावून घेणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य ते प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर या प्रश्नी लवकरच मा.मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार असल्याचेही सांगितले.