|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » leadingnews » केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दिल्ली येथे बैठक होणार आहे. या बैठकीत तिहेरी तलाक बंदीविरोधातील विधेयक मांडण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने मागच्या कालावधीत तिहेरी तलाक विधेयक संसदेत मांडले होते. मात्र, हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले नव्हते. त्यानंतर सरकारला यासाठी अध्यादेश काढावा लागला होता. मोदी सरकारला त्यासाठी दोनदा वटहुकूम काढावा लागला. आता त्याची मुदत 3 जून रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱया कार्यकाळात पुन्हा एकदा भाजपा तिहेरी तलाक बंदी विरोधी कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. आज होणाऱया केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या विधेयकाला मंजूरी मिळण्याची शक्मयता आहे.

Related posts: