|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » मदरशांना मुख्य प्रवाहातआणण्यासाठी सुधारणा करा : आझम खान

मदरशांना मुख्य प्रवाहातआणण्यासाठी सुधारणा करा : आझम खान 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मदरशांना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यामध्ये सुधारणा करावी लागेल. मदरशात नथुराम गोडसे आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यासारख्या व्यक्ती जन्माला येत नाहीत. तसेच दहशतवादी कारवायात सहभागी असलेल्या लोकांचे उदात्तीकरण होऊ शकत नाही, असे विधान समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी केले आहे.

मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या मोदींच्या भूमिकेवर विचारलेल्या प्रश्नाला आझम खान यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे उत्तर दिले. आझम खान म्हणाले, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर जामिनावर बाहेर येऊन भोपाळमधून भाजपाच्या खासदार म्हणून त्या निवडून आल्या. प्रचारादरम्यानही त्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत होत्या. ज्यात त्यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. मदरशांना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यामध्ये सुधारणा करावी लागेल, असेही खान म्हणाले.