|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » श्रीलंका बॉम्बस्फोट प्रकरणी तामिळनाडूत छापेमारी

श्रीलंका बॉम्बस्फोट प्रकरणी तामिळनाडूत छापेमारी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

श्रीलंकेत ईस्टरसंडे दिवशी झालेल्या बॉम्ब हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने तामिळनाडूतील तीन संशयितांच्या घरावर बुधवारी सकाळी सहा वाजता छापा टाकला.

एनआयएच्या अधिकाऱयांनी पोथनूरमध्ये अझरुद्दीन उक्कदम, सद्दाम, अकबर यांच्यासह कुणियामथूरमध्ये अबुबकर सिद्दीक आणि अल अमीम कॉलोनीत इधियाथुल्ला यांच्या घरावर छापा टाकला असून, त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना 21 एप्रिलला श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेल्सना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 359 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 500 हून अधिक जण जखमी झाले होते. दरम्यान, एनआयएची टीम काही दिवसांपूर्वी आयएसच्या संशयितांची माहिती घेण्यासाठी श्रीलंकेला गेली होती. या माहितीच्या आधारावर एनआयएच्या अधिकाऱयांनी आज कोयंबत्तूरमध्ये छापेमारी करुन तपास सुरु केला आहे.