|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » स्पाईसजेटच्या विमानाचा हवेत फुटला टायर

स्पाईसजेटच्या विमानाचा हवेत फुटला टायर 

राजस्थानच्या जयपूर विमानतळावर बुधवारी मोठी दुर्घटना टळली आहे. दुबईतून येत असलेल्या स्पाइसजेट विमानाच्या लँडिंगपूर्वी उजव्या बाजूला टायर फुटल्याचे निदर्शनास आले. जयपूर हवाई वाहतूक नियंत्रकाने याची माहिती वैमानिकाला दिल्यावर जयपूरमध्ये या विमानाचे सुरक्षित लँडिंग करविण्यात आले. आता याच विमानातून दुबईत परतणारे लोक विमान बदलण्याची मागणी करत आहेत.