|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » ‘ऍमेझॉन’ जगातील अव्वल कंपनी

‘ऍमेझॉन’ जगातील अव्वल कंपनी 

वृत्तसंस्था/ लंडन

ई-विक्रीसह किरकोळ क्षेत्रातील आघाडीची अमेरिकी कंपनी ऍमेझाँनने जगात अव्वल कंपनी ठरण्याचे स्थान मिळविले आहे. सर्वाधिक ब्रँड मूल्य राखणाऱया कंपन्यांच्या जागतिक सूचीत गुगलला मागे टाकत ऍमेझाँनने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे ऍपल व गुगल यांना दुसऱया व तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले.

कंपन्यांचे मूल्यांकन करणाऱया जागतिक बाजारातील कार्यरत कॅन्टर या संस्थेने आघाडीच्या 100 कंपन्यांची सूची प्रसिद्ध केली आहे. यात ऍमेझाँनच्या ब्रँड मूल्यात 52 टक्क्मयांनी वाढ नोंदविण्यात आली असून ते 315 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली आहे.

चौथ्या स्थानी मायक्रोसॉफ्ट

यापूर्वी तिसऱया क्रमांकावर असणाऱया ऍमेझाँनने गुगलला मागे सारत पहिल्या स्थानी पटकाविले आहे. ऍपल आणि गुगलचे ब्रँड मूल्य अनुक्रमे 309.5 आणि 309 अब्ज अमेरिकी डॉलर नोंद झाले आहे. या सूचीत चौथ्या स्थानी मायक्रोसॉफ्टचा क्रमांक लागला.