|Thursday, June 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधीच राहतील

काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधीच राहतील 

पक्ष प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांचा विश्वास

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, आहेत आणि भविष्यातही राहतील, असा विश्वास पक्ष प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी व्यक्त केला. ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष नेत्यांच्या बैठक झाली. यावेळी अहमद पटेल, मल्लिकार्जून खर्गे, गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम, के. सी. वेणूगोपाल, जयराम रमेश आणि आनंद शर्मा उपस्थित होते. यावेळी हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमधील पक्षाच्या रणनीतीवर चर्चा झाली. यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सुरजेवाला यांनी राहुल गांधीच पक्षाध्यक्षपदी कायम राहतील असे स्पष्ट केले.

 लोकसभा निवडणुकीतील नामुष्कीजनक पराभवानंतर 25 मे रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठक झाली. या वेळी राहुल गांधी यांची अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र तो फेटाळण्यात आला. राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदी राहावे, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र ते राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांमधील संभ्रम कायम आहे.