|Thursday, June 20, 2019
You are here: Home » क्रिडा » दुहेरी ऑलिंपिक विजेती सेमिन्या अजिंक्य

दुहेरी ऑलिंपिक विजेती सेमिन्या अजिंक्य 

वृत्तसंस्था/ माँट्रियल

मंगळवारी येथे झालेल्या माँट्रियल ऍथलेटिक्स स्पर्धेत महिला धावपटू कॅस्टेर सेमिन्याने महिलांच्या 2000 मी. धावण्याच्या शर्यतीत प्रथम स्थान मिळविले. गेल्या काही दिवसापासून सेमिन्या आणि आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या क्रीडा नियंत्रण मंडळामध्ये न्यायासाठी वाद चालू आहे.

माँट्रियलमध्ये झालेल्या महिलांच्या 2000 मी. धावण्याच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेच्या सेमिन्याने 5 मिनिटे, 38.19 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान मिळविले. आता आगामी विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत सेमिन्या 800 मी. धावण्याच्या शर्यतीतील विजेतेपद स्वत:कडे राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे.