|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » हरमलात भेंडीचे झाड पडून वीज पुरवठा व दूरध्वनी सेवा खंडित

हरमलात भेंडीचे झाड पडून वीज पुरवठा व दूरध्वनी सेवा खंडित 

हरमल / वार्ताहर

येथील तिठा भागांतील व्यापारी प्रभाकर वायगंणकर यांच्या आस्थापना समोरील भेंडीचे झाड वीज  व टेलिफोनच्या तारांवर पडल्याने सेवा खंडित झाली सुदैवाने इजा व नुकसानी झाली नाही.त्याचवेळेस एक जे÷य नागरिक रस्त्यावरून गेल्याने जीवितहानी टळली.

काल सकाळी 11च्या सुमारास वायगंणकर यांच्या इमारतीसमोरील जुनाट भेंडीचे झाड कलंडलेल्या स्थितीत होते.त्या भेंडीच्या वरील भागातून वीज व दुरध्वनीच्या तारा गेल्या होत्या.कलंडलेल्या भेंडीच्या झाडाने दोन्ही तारांवर लोटांगण घेतल्याने दूरध्वनी ची वायर तुटून रस्त्यावर पडली तर विजेच्या तारांवरताण आल्याने विजखांब वरील बाजूने मोडला,मात्र तुटून पडला नसल्याने जीवितहानी टळली.

पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.वीज खात्यांच्या कर्मचाऱयांनी लगोलग दुरुस्ती काम केल्याने वीज पुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी धन्यवाद दिले.

दरम्यान, ह्या भागातील कित्येक वीज तारा जोडण्या जीर्ण झाल्या असून त्याची दुरुस्ती व नवीन तारां  केबल घालण्यात खात्याकडून दिरंगाई केली जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.नवीन वीज तारां खात्याने त्वरित घालाव्यात अशी मागणी सरपंच इनासीयो डिसौझा यांनी केली आहे.