|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » श्रीनगरजवळ पुन्हा कारला अपघात

श्रीनगरजवळ पुन्हा कारला अपघात 

प्रतिनिधी/ बेळगाव

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील श्रीनगरजवळ बुधवारी सायंकाळी दुभाजकाला ठोकरून भररस्त्यावर कार उलटला. केवळ सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा पोहोचली नाही. या अपघातानंतर काही काळ वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला होता.

घटनेची माहिती समजताच वाहतूक उत्तर विभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. यासंबंधी बुधवारी रात्री वाहतूक उत्तर विभाग पोलिसांशी संपर्क साधला असता या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

8 दिवसांपूर्वी याच परिसरात भरधाव कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात औरंगाबाद येथील सात तरुण ठार झाले होते. श्रीनगरजवळ महामार्गावर अपघातांची संख्या वाढत चालली आहे.