|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » इंग्लंडपुढे विंडिजचे 213 धावांचे माफक आव्हान

इंग्लंडपुढे विंडिजचे 213 धावांचे माफक आव्हान 

ऑनलाईन टीम / पुणे : 

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडच्या प्रभावी माऱयासमोर वेस्ट इंडिजचा डाव 44.4 षटकांत सर्वबाद 212 धावांवर आटोपला. इंग्लंडने सुरुवात चांगली केली असून, त्यांच्यापुढे माफक आव्हान आहे.

वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. लुईस 2 धावा करून बाद झाला. पाठोपाठ होपही परतला. ख्रिस गेल मोठी मजल मारेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तोही 36 धावांवर बाद झाला. त्यानंतर हेटमायर व पुरनने वेस्ट इंडिजची पडझड थांबवली. या दोघांची जोडी चांगली जमलेली असतानाच हेटमायर सोपा झेल देऊन 39 धावांवर बाद झाला. पुरनने एक बाजू लावून धरली. मात्र, दुसऱया बाजूने फलंदाज बाद होत गेले. पुरनची झुंजार खेळीही 63 धावांवर थांबली. त्यानंतर होल्डरसह अन्य खेळाडूही स्वस्तात परतले.

आर्चरने भेदक गोलंदाजी करीत 3 विकेट घेतल्या, तर वूडनेही 3 बळी मिळविले. 213 धावांच्या माफक आव्हानासमोर इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. बेअरस्टो व ज्यो रूट यांनी विंडिजच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करीत चांगला रन रेट राखला.