|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळावर जंगी स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळावर जंगी स्वागत 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शाहू कारखान्याचे दिवंगत अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा अनावरणासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरात आले होते. कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन झाल्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

कागल येथील शाहू कारखान्याच्या आवारात दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळय़ाचे अनावरण आणि शेतकरी मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. दरम्यान दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांचे कोल्हापूरात उजळाईवाडी विमानतळावर आगमन झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर,अमल महाडिक, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी नगरसेवक आर.डी.पाटील, सुभाष रामुगडे, तुषार देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.