|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राजश्री बांदोडकर कारापूरकर यांना यंदाचा बाल साहित्य पुरस्कार

राजश्री बांदोडकर कारापूरकर यांना यंदाचा बाल साहित्य पुरस्कार 

मडगाव/ प्रतिनिधी

साहित्य अकादमी तर्फे देण्यात येणाऱया बाल साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून त्यात कोकणी विभागातून राजश्री बांदोडकर कारापूरकर यांना त्यांच्या ‘चिटकुल्या चिंकीचें विशाल विश्व’ या पुस्तकाला यंदाचा बाल साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. राजश्री बांदोडकर कारापूरकर या फर्मागुडी-फोंडा येथील रवी नाईक उच्च माध्यमिक विद्यालयात फिजिक्सच्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

लहान मुलांमध्ये विद्यानाची अभिरूची निर्माण व्हावी यासाठी वैज्ञानिक संकल्पना समोर ठेऊन राजश्री बांदोडकर कारापूरकर यांनी ‘चिटकुल्या चिंकीचें विशाल विश्व’ या पुस्तकाची निर्मिती केली होती. या पुस्तकात त्यांनी जल-चक्र (वॉटर-सायकल) हा विषय हाताळला आहे.

लहान मुंगी अर्थात छोटी चिंकी हिला पर्यावरणाबद्दल कमालीचे आकर्षण असते.  तिच्या आयुष्याच्या वाटचालीत तिला तिच्या आईचे मार्गदर्शन लाभत असते. आईच तिचे संरक्षण करताना, विविध समस्यांवर कशी उपाय योजना आखावी याचे ज्ञान देत असते. जल चक्र अर्था वॉटर सायकलचे ज्ञान तिला यातून मिळते. अत्यंत सुलक्ष अशा शैलीत राजश्री बांदोडकर कारापूरकरने हे पुस्तक बच्चे कपंनीसाठी पुढे आणले आहे.

स्वता शिक्षिकी पेशात असलेल्या राजश्री बांदोडकर कारापूरकर आपल्या विद्यार्थ्यांना फिजिक्स (भौतिक शास्त्र) हा विषय सुलक्ष रित्या शिकवित असतात. त्यांनी बाल साहित्यात आपले योगदान दिले असून मुलांना कठीण विषयाचे सहज आकलन व्हावे यासाठी ऍनिमेशन फिल्मची निर्मिती देखील केली आहे.

वैज्ञानिक संकल्पनेतील त्यांची ‘विद्यान योगी’, ‘सैमाकडे संवाद’, ‘मळबाकडेन संवाद’, ‘स्पेस टॉक’, ‘ताऱयांच्या वनात स्वप्नाची शाळा’ आणि ‘चिटकुल्या चिंकीचें विशाल विश्व’ ही बाल साहित्ये प्रकाशित झालेली आहेत.

Related posts: