|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांनी मानले मुख्यमंत्र्याचे आभार

मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांनी मानले मुख्यमंत्र्याचे आभार 

प्रतिनिधी/ फोंडा

मुंबई येथील अंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानसेवेच्या मुंबई-गोवा फ्लाईटला  सुमारे 5 तास उशिरा  झाल्यामुळे अडकलेल्या सुमारे शेकडो प्रवाशांची सोय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केल्यामुळे मगोचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून आभार व्यक्त केले आहे. सदर घटना गुरूवार रात्री 13 रोजी मुंबई येथील अंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली होती. डॉ. भाटीकर सुद्धा सदर फ्लाईटमध्ये प्रवाशी म्हणून होते.

मुंबई विमानतळावरून एअर इंडियाची ल्फाईट गुरूवारी रात्री 9.30 वा. गोव्यासाठी निघणार होती. काही कारणास्तव सदर प्लाईट उशिरा असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आणखी दोन तास उशिरा असल्याचे अपडेट देण्यात आले. त्यानंतर आणखी दोन तास, मात्र याबाबत ठोस कारण सांगण्यात सदर कंपनीचे कर्मचारी मनाई केली. तेव्हा फ्लाईटसाठी थांबलेल्या प्रवाशांनी जाब विचारली व याप्रकाराबाबत गोंधळ घातला. कंपनीचा कोणताही कर्मचारी जाब देण्यास तयार नव्हता, यावेळी सुरक्षा यंत्रणा बोलावून अटक करण्याचा धाक दाखविण्याचा प्रकार कंपनीच्या सुरक्षा विभागातर्फे  करण्यात आला. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून डॉ केतन भाटीकर यांनी रात्री 1 वा. सुमारास घटनेची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिली असता तात्काळ उपाययोजना करण्यात आली तसेच तेथील रेस्टॉरॅन्टमध्य सर्व प्रवाशांची जेवणाची सोयदेखील करण्यात आले. त्यानंतर अर्ध्या तासात फ्लाईट सेवा उपलब्ध करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यानी दिले. मुख्यमंत्री स्वत: त्यावेळी दिल्ली येथे असल्याची माहिती प्राप्त झाली असून सर्व प्रवाशांसाठी रात्री 2.30 वा. फ्लाईटसेवा उपलब्ध करण्यात आली.

मुख्यमंत्र्यानी दाखविलेल्या काळजीवाहू धोरणामुळे तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी  उपलब्ध केलेल्या फ्लाईटमधून सुखरूप गोव्यात पोचलेल्या सर्व प्रवाशांनीही विविध शोसल मिडीयाच्या माध्यमातून आभार व्यक्त केले आहे

Related posts: