|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खासगी कंपन्यामध्ये 60 टक्के गोमंतकीयांना प्राधान्य देणे गरजेचे

खासगी कंपन्यामध्ये 60 टक्के गोमंतकीयांना प्राधान्य देणे गरजेचे 

प्रतिनिधी/ पणजी

 राज्य रोजगार धोरण बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नोकऱया निर्मितीकरण्यावर सरकारची भर असणार आहे. यासाठी सर्व खासगी कंपन्यांना 60 टक्के नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यास भाग पाडले जाणार आहे, असे कामगार मंत्री रोहन खवटे sयांनी सांगितले. गोवा कामगार व रोजगार आयुक्त व उद्योग संघटनाने आयोजित केलेल्या ‘राज्य रोजगार धोरण’ या चर्चासत्राच्या कार्यक्रमात बोलत होते.

 गेव्यातील सुशिक्षित युवकांना गोव्यातच चांगल्या पगाराची नोकरी मिळावी हे सरकारचे मुख्य ध्येय आहे. मागिल तीन वर्षात अनेक युवकांना उच्छ शिक्षित होऊन गोव्यात नोकऱया मिळाल्या आहे. पूर्वी अनेक युवक कामानिमित्त परराज्यात किंवा परदेशात स्थायिक होत होते. त्यांना गोव्यात रोजगार संधी उपलब्ध होत नव्हती. आता लवकरच आयटी हब व स्टार्टअप पोलिसीमार्फत मोठय़ा प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार आहे.

खासगी कंपन्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य

 राज्यातील सर्व कंपनींचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अध्यक्षांची बैठक घेतली आहे. या बैठकीत नवीन  रोजगार निर्मितीवर भर देण्यास सांगितले आहे त्याच प्रमाणे  या रोजगार निर्मितीमध्ये जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य देण्यास भाग पाडले जाणार आहे. यामुळ स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे यावेळी कामगार मंत्री रोहन खवटे यांनी सांगितले.

राज्य रोजगार धोरण हे गोमंतकीयांच्या हितासाठी आहे. सध्या मोटय़ा प्रमाणात सुशिक्षित युवकांची संख्या वाढत आहे. सर्वाना सरकारी नोकऱया मिळणे शक्य  नसल्याने राज्यातील रोजगार धोरण बळकट करणे गरजेचे आहे. या धोरणामुळे राज्यात अनेक नोकऱया तयार होणार आहे. या नोकऱयामध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळणार आहे. सरकार यासाठी सर्व खासगी कंपन्यांशी करार करणार आहे, असेही यवेळी कामगार मंत्री म्हणाले.

 या चर्चासत्राच्या कार्यक्रमात गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संदिप भांडारे, बीएनआयचे अध्यक्ष राजकुमार कामत, आयटकचे कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, पुती गावकर तसेच राज्यातील विविध कंपन्यांचे मुख्यकार्यकारी अधिकरी उपस्थित होते.