|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » ठाकुर्ली येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड, वाहतूक विस्कळीत

ठाकुर्ली येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड, वाहतूक विस्कळीत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ठाकुर्ली येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्ये रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱया आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱया लोकलचा खोळंबा झाला असून, लोकल 20 ते 25 मिनिटे उशिरा धावत आहे. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेतच लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मध्य रेल्वेच्या विशेष पथकाने डोंबिवली स्थानकावर भेट दिली असून लवकरच सेवा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले आहे.

Related posts: