|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » लग्नग्नाचा खर्च वाचवून दुष्काळग्रस्थांना मदत

लग्नग्नाचा खर्च वाचवून दुष्काळग्रस्थांना मदत 

वार्ताहर /बुध :

नागनाथवाडी (ता. खटाव) येथील विशाल ननावरे आणि सुष्मिता ननावरे या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने अनावश्यक विवाह खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री दुष्काळ सहाय्यता निधीत चाळीस हजारांचा धनादेश देवून समाजापुढे आदर्श ठेवला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे ननावरे कुटुंबियांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत सुपूर्त केली. दुष्काळग्रस्तांप्रती सहानुभूती दाखवणाऱया ननावरे दाम्पत्यांचे जिल्हाधिकाऱयांनीही कौतुक केले.

    नागनाथवाडी येथील विशाल शंकरराव ननावरे या उच्चशिक्षित तरूणाचा विवाह वांगी (इंदापूर) येथील सुष्मिता जाधव हिच्याशी नुकताच पार पडला. लग्नग्नाची बोलणी करतानांच ननावरे कुटुंबियांनी नोंदणी पध्दतीने विवाह करून लग्नग्नासाठी होणारा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला. जाधव कुटुंबियांनीही त्यास तत्काळ होकार दिला. विशाल आणि सुष्मिताचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. लग्नग्नातील वाचवलेली रक्कम दुष्काळग्रस्तांना पोहोचविण्यासाठी ननावरे आणि जाधव कुटुंबियांनी थेट सातारा येथील जिल्हाधिकाऱयांचे कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे विशाल आणि सुष्मिता यांनी चाळीस हजारांचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी सिंघल म्हणाल्या, समाजात आजही अशा उदात्त विचारांची माणसे आहेत हे पाहून खूप आनंद झाला. लग्नग्नातील अनावश्यक खर्च टाळून
दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा विशाल, सुष्मिताचा निर्णय इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. मुख्यमंत्री दुष्काळनिधीला मदत केल्यानंतर बोलतांना विशाल ननावरे म्हणाले, माझ्या नागनाथवाडीसह खटाव-माण तालुक्यातील जनता पाणी टंचाईने हैराण झाली आहे. गावोगावी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. तहान भूक विसरून कडक उन्हातही सर्वजण पाणी अडविण्यासाठी कामे करत आहेत. या कामासाठी मदत करण्याच्या हेतूनेच नोंदणी पध्दतीने विवाह करून विवाह खर्चाला फाटा देत जलसंधारण कामास मदत केली. त्यामुळे आम्हा ननावरे आणि जाधव कुटुंबियांना आत्मिक समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. धनादेश देतेवेळी माजी सीईओ नामदेव ननावरे, शंकरराव ननावरे, भिमराव जाधव, छाया ननावरे, संभाजी घाडगे, सुनिल निंबाळकर, शोभा ननावरे, वर्षाराणी फडतरे, सुरेश घाडगे, प्रकाश बागल, पुंडलिक ननावरे, विशाल जाधव, सुधाकर घाडगे, विशाल जाधव, प्रतापराव घाडगे उपस्थित होते….

Related posts: