|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » 2022 मध्ये होणाऱया कॉमनवेल्थ स्पर्धेतून नेमबाजीला डावलले

2022 मध्ये होणाऱया कॉमनवेल्थ स्पर्धेतून नेमबाजीला डावलले 

 

ऑनलाईन टीम  / नवी दिल्ली : 

2022 मध्ये बर्मिंगहॅममध्ये होणाऱया कॉमनवेल्थ स्पर्धेतून नेमबाजी खेळाला हटवण्यात आले आहे. भारतासाठी हा मोठा झटका आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत नेमबाजीतून भारतीय खेळाडू कायम पदकांची लयलूट करत असतात.

नेमबाजीला या स्पर्धेतून डावलल्यामुळे भारताच्या पदकतालिकेतील स्थानावरही परिणाम होणार आहे, शिवाय भारतीय नेमबाज एका मोठय़ा व्यासपीठालाही मुकणार आहेत. नेमबाजीचं स्थान कॉमनवेल्थमध्ये अढळ राहावं म्हणून भारताने प्रयत्नांची पराका÷ा केली, पण आयोजन समिती काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती,’ अशी माहिती सचिव राजीव भाटीया यांनी दिली.

2018 मध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे कॉमनवेल्थ स्पर्धा पार पडली. यात भारताने एकूण 66 पदकांची कमाई केली होती आणि त्यापैकी 16 पदके नेमबाजीतून आली होती. भारताने 2018 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदकतालिकेत तिसरे स्थान पटकावले होते.

 

Related posts: