|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘स्माईल प्लीज’चा ‘श्वास’

‘स्माईल प्लीज’चा ‘श्वास’ 

रात्र सरल्यानंतर सकाळ ही होतेच. याच उक्तीप्रमाणे दु:खानंतर सुखही येणारच असते. असाच काहीसा सकारात्मक संदेश देणारे ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटातील ‘श्वास दे’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्यावर मुंबईमधील वेगवेगळय़ा ठिकाणी चित्रित करण्यात आले आहे. गाण्यात काही ठिकाणी मुक्ता फोटोग्राफी करताना दिसत असून अनेक सुंदर क्षण ती आपल्या पॅमेऱयामध्ये टिपतेय. यातूनच आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा असतो, असा संदेश या गाण्यातून मिळत आहे. ललित आणि मुक्ताची लोकप्रियता बघता हे गाणे सार्वजनिक ठिकाणी चित्रित करणे म्हणजे एक आव्हानच होते. तरीही मुक्ता आणि ललितने या ठिकाणी धमाल, मज्जा मस्ती करत या गाण्याचे चित्रीकरण एका दिवसात केले.

मंदार चोळकर यांच्या अर्थपूर्ण शब्दांना रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केले असून रोहन प्रधान यांनी स्वरबद्ध केले आहेत. या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर यांच्या प्रमुख भूमिका असून तफप्ती खामकर, सतीश आळेकर सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. येत्या 19 जुलै रोजी ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Related posts: