|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » क्रिडा » 27 वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने विश्वचषकात केली अशी कामगिरी

27 वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने विश्वचषकात केली अशी कामगिरी 

विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडला. या सामन्यात अफगाणने भारतीय संघाला चांगलीच टक्कर दिली पण अखेरीस टीम इंडियाने हा सामना 11 धावांनी जिंकत गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. कर्णधार विराट कोहलीने 63 चेंडूत 67 धावांची अर्धशतकी खेळी साकारताना विजयात मोलाचे योगदान दिले. याबरोबर या विश्वचषकातील विराटचे हे सलग तिसरे अर्धशतक आहे. त्याने या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 82 तर पाकविरुद्ध 77 धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती. यामुळे विश्वचषकामध्ये सलग तीन डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा विराट हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी 1992 च्या विश्वचषकात मोहम्मद अझरुद्दीनने भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना विंडीज, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतकी खेळी केल्या होत्या.

 तसेच विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक सलग डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम सध्या नवज्योत सिंग सिद्धू आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. त्यांनी विश्वचषकातील सलग चार डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. सिद्धू यांनी 1987 च्या विश्वचषकात हा पराक्रम केला होता. सचिनने असा पराक्रम दोन वेळा केला आहे. त्याने 1996 व 2003 च्या विश्वचषकात सलग 4 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक सलग डावात

50 किंवा अधिक धावा करणारे क्रिकेटपटू

4 — नवज्योत सिंग सिद्धू —…….. 1987

4 — सचिन तेंडुलकर —……………. 1996 व 2003

3 — मोहम्मद अझरुद्दिन —……….. 1992

3 — सुनील गावसकर —………….. 1987

3 — राहुल द्रविड —……………….. 1999

3 — युवराज सिंग —………………. 2011

3 — रोहित शर्मा —………………… 2019

3 — विराट कोहली —         2019