|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इंग्लंडचे मुख्य आकर्षण केंद्र…लंडन ब्रिज

इंग्लंडचे मुख्य आकर्षण केंद्र…लंडन ब्रिज 

विवेक कुलकर्णी /  लंडन

इंग्लंडमधील पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र म्हणजे लंडन ब्रिज. लंडन परिसरातील सर्व मुख्य रस्त्यांना जोडणारा मुख्य सेतू म्हणजे लंडन ब्रिज. लंडन शहर व साऊथवॉर्कच्या मधोमध हा ऐतिहासिक ब्रिज उभारला गेला आहे. सध्याच्या ब्रिजची उभारणी 1973 मध्ये झाली. मात्र, या ब्रिजला थोडाथोडका नव्हे तर तब्बल 2 हजार वर्षांचा इतिहास आहे. आजच्या घडीला या ब्रिजवरुन रोज साधारणपणे 1 लाख 30 हजार वाहनांचा प्रवास होतो.

पूल ऑफ लंडनच्या वेस्टर्न एण्डला सध्याचा लंडन ब्रिज आहे. ब्रिज हाऊस इस्टेटस् ही संस्था या 30 मीटर्सच्या ब्रिजची देखभाल पाहते. साधारणपणे 2 हजार वर्षांपूर्वी रोमन तज्ञांनी येथे सर्वप्रथम ब्रिज उभारला. अर्थातच, तो ब्रिज लाकडी होता. काही ठिकाणी साकवही होते. नंतर ते कालांतराने एक तरी नष्ट होत गेले किंवा नष्ट केले गेले. पुढे यात सुधारणा होत गेल्या आणि 1923 च्या दरम्यान स्टोन ब्रिजने त्याची जागा घेतली. पाचव्या शतकात रोमन राज्य संपुष्टात आले आणि त्यानंतर ब्रिजच्या इतिहासालाही नव्याने सुरुवात झाली. वास्तविक, रोमन लोकांनी आपल्यावर राज्य केले, याचा इंग्लिश वासियांना अभिमान आहे आणि सुधारणावादी चळवळीचे, प्रशासनाचे श्रेय ते रोमन्सना देतात. 1831 ते 1967 या कालावधीत लंडन ब्रिजने आधुनिक रुपडे घेतले. सध्याच्या ब्रिजचे आर्किटेक्ट लॉर्ड होलफोर्ड व मॉट, हे, अँडरसन या इंजिनियर्सनी केले आहे.

3 जून 2017 दिवशी याच ब्रिजला दहशतवाद्यांनी आपले टार्गेट केले होते. त्यावेळी तीन इस्लामी दहशतवाद्यांनी ब्रिजवरुन चालणाऱया व्यक्तींवर अमानूष गोळीबार केला आणि त्यात तिघा जणांना आपले प्राण गमवावे लागले. पुढेही त्या हल्लेखोरांनी विविध ठिकाणी हिंसाचार केला आणि तब्बल 48 जण त्यात जखमी झाले. या हल्ल्यामुळे ब्रिजचे पेव्हमेंट व रस्ता यात आता अधिक सुरक्षाव्यवस्था तैनात केली गेली आहे.