|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Automobiles » ‘एमजी हेक्टर’ भारतात लाँच

‘एमजी हेक्टर’ भारतात लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मॉरिस गॅरेज (एमजी) मोटर्सने आपली बहुप्रतीक्षित एसयूव्ही ‘एमजी हेक्टर’ भारतात लाँच केली आहे.

‘एमजी हेक्टर’ ही भारतातील पहिली इंटरनेट कार आहे. ग्राहकांना द ‘एमजी शिल्ड’ हे भारतातील सर्वोत्तम व्हेईकल ओनरशिप पॅकेज दिले जाणार आहे. या पॅकेजद्वारे गाडीच्या खासगी मालकांना अमर्याद किलोमीटर्ससाठी 5 वर्षांची सर्वसमावेशक मॅन्युफॅक्चरर वॉरंटी मोफत दिली जाणार आहे.

तसेच कंपनीकडून ग्राहकांना हेक्टर गाडीच्या पुनर्विक्रीमूल्याचीही हमी देण्यात आली आहे. यासाठी निर्माता कंपनीने कारदेखो या ऑटोमोटिव्ह पोर्टलशी हातमिळवणी केली आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ‘3-60’ योजनेअंतर्गत एमजी हेक्टर गाडी विकत घेऊन तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर या पोर्टलकडून ती 60 टक्के अवशिष्ट मूल्याने बायबॅक करणार आहे.

एमजी हेक्टर एकूण 11 कॉम्बिनेशन्स आणि स्टाईल, सुपर, स्मार्ट आणि शार्प अशा चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये पेट्रोल, पेट्रोल हायब्रीड आणि डिझेल असे इंजिनाचे चार पर्याय आहेत. यापैकी पेट्रोल गाडी ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे. 4 जूनपासून सुरू झालेल्या पूर्वनोंदणीच्या 23 दिवसांमध्ये तब्बल 10,000 हून अधिक जणांनी एमजी हेक्टर गाडीचे बुकींग केले आहे. गाडीची पूर्वनोंदणी करणाऱया ग्राहकांना कंपनीच्या भारतभरातील 120 केंद्रांच्या नेटवर्कच्या माध्यमातून जुलैच्या पहिल्या आठवडय़ात एमजी हेक्टर पोहोच करण्यात येणार आहे. या कारची किंमत 12.18 लाख ते 16.88 लाख रुपयांपर्यंत आहे.

Related posts: