|Thursday, November 14, 2019
You are here: Home » Top News » राहुल गांधींची आज काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक

राहुल गांधींची आज काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी बैठक घेणार आहेत. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल यांची काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांशी पहिलीच बैठक आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभव, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरण्याची शक्मयता आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, आणि पाँडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यासोबत राहुल आज बैठक घेणार आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना जबाबदारीची जाणीव नाही, अशा शब्दांत युवक काँग्रेसच्या बैठकीत राहुल यांनी नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे काँगेस नेत्यांमध्ये नाराजी पसरली होती.

Related posts: