|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून 33 जण ठार, 22 जखमी

किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून 33 जण ठार, 22 जखमी 

ऑनलाईन टीम / किश्तवाड :

जम्मू-काश्मरीच्या किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 33 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 22 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस केशवानहून किश्तवाडकडे निघाली होती. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस दरीत कोसळली. या भीषण अपघात 33 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 22 जण जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. किश्तवाड येथील पोलीस उपायुक्त अंग्रेज सिंह राणा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Related posts: