|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मुक-कर्णबधिरांचा निशब्द हुंकार…!

मुक-कर्णबधिरांचा निशब्द हुंकार…! 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

मुक-कर्णबधिरांचा निशब्द हुंकार…! निमित्त होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक-कर्णबधिर असोसिएशनतर्फे सोमवारी न्याय हक्काच्या व नोकरीच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या  बेमुदत उपोषणाचे. या उपोषणामध्ये जिल्हयातील सुमारे 150 हून अधिक मुक-कर्णबधिरांनी कुटुंबासमवेत सहभाग नोंदविला आहे.

मुक-कर्णबधिर असोसिएशनतर्फे जिल्हाप्रशासनाकडे 1998 सालापासून आजअखेर सुमारे 14 वेळा प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाने अक्षम्य दूर्लक्ष केले आहे. या प्रलंबित मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून मुक-कर्णबधिकर असोसिएशनतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. मुक-कर्णबधिरांच्या मागण्यांमध्ये, जिल्हयातील मूक बधिरांच्या अनुशेष भरतीमध्ये समाज संधी, समान हक्क या तत्वावर सरळ सेवेत रिक्त पदे भरून घेण्यात यावीत, शासकीय नोकरीत ज्या कर्णबधिर उमेदवारांमध्ये मूक बधिरत्वाचे प्रमाण 75 ते 100 टक्के आहे, अशांनाच प्राध्यान्याने सामावून घ्यावे, कर्णबधिरत्व तपासणी सामुग्री त्वरीत उपलब्ध करावी, खासगी रूग्णालयाकडून होणारी भरमसाठ फीव्दारे लूट बंद करावी, बोगस कर्णबधिर व मूकबधिर (अपंग) प्रमाणपत्र देण्याचे प्रकार त्वरीत बंद करण्यासंदर्भात संबंधीतांना सूचना द्याव्यात, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत आदींच्या उत्पन्नाच्या 3 टक्के निधी दिव्यांग योजनेवर खर्च करून दिव्यांगांना त्वरीत लाभ मिळवून द्यावा, शासकीय कार्यालयातील नोकऱयातील आरक्षित जागा त्वरीत भराव्यात, सरकारी रूग्णालयातच पूर्वीप्रमाणे माफक फी वर तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे आदेश व्हावेत, शासनाच्या मंजूर आदेशाप्रमाणे वाहन चालवण्याचा परवाना देण्यात यावा, प्रत्येक महिन्याला 600 रूपये ऐवजी 3 हजार रुपयांची पेन्शन वाढवून मिळावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी मूक-कर्णबधिर असोसिएशनचे अध्यक्ष अतुल फणसाळकर, सरचिटणीस अतुल भाळवणे आदींसह पदाधिकारी, सभासद आदींसह जिल्हयातील शिरोळ, इचलकरंजी, पेठ वडगांव, हातकणंगले, आजरा, चंदगड, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, करवीर, कागल, राधानगरी आदी भागातून सुमारे 150 हून अधिक मूक-कर्णबधिर आपल्या कुटुंबीयांसमवेत उपस्थित होते.

Related posts: