|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » गळफास घेऊन शेतकऱयाची आत्महत्या

गळफास घेऊन शेतकऱयाची आत्महत्या 

 

ऑनलाइन टीम /सासवड : 

कर्जबाजारीपणाला कंटाळून पुरंदर तालुक्मयातील पांगारे येथील तरूण शेतकऱयाने पोल्ट्री शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दत्तात्रय माणिकराव काकडे (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरूण शेतकऱयाचे नाव आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पांगारे नजीक शिंदेवाडी – भाटभळवाडी येथे काल, मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

दत्तात्रय काकडे यांचे शिंदेवाडी येथे पाच हजार पक्षांचे पोल्ट्रीचे शेड आहे. त्यासाठी त्यांनी काही स्थानिक सावकारांकडून 5 लाख रुपये व्याजाने घेतले होते. संबंधित सावकाराने या पैशांसाठी काकडे यांच्याकडे तगादा लावला. याबाबत काकडे यांनी एका खासगी पतपेढीत कर्जासाठी प्रयत्न केला. मात्र पैशांच्या अडचणीतबाबत त्याने मित्र परिवार किंवा कुटुंबियांनाही याची माहिती दिली नाही. याबाबत राहूल नारायण काकडे यांनी सासवड पोलिस स्टेशनमध्ये माहिती दिली. सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून याबाबत सासवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दत्तात्रय काकडे हे त्यांच्या आई वडिलांना एकुलते एक होते. त्यांचे आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Related posts: