|Sunday, October 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘फुलपाखरू’च्या सेटवर भजी पार्टी

‘फुलपाखरू’च्या सेटवर भजी पार्टी 

हा फोटो पाहून, हे मालिकेतले दृश्य आहे का? असा प्रश्न सर्वांनाच पडेल. पण, तसे काही नाही. मुसळधार पावसामध्ये काही कलाकारांनी भजी पार्टीचा आनंद घेतला. झी युवा वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ या लोकप्रिय मालिकेतील प्रेक्षकांचे लाडके कलाकार हृता दुर्गुळे आणि यशोमान आपटे यांनी स्वत: भजी बनवली. जोरदार पाऊस, गरमागरम भजी आणि कडक चहा हे कॉम्बिनेशन अफलातून असून अशा पावसाळी वातावरणात कलाकारांना देखील भजी खायचा मोह आवरला नाही. डाएट विसरून सर्व कलाकारांनी भज्यांवर ताव मारला. भर पावसात मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांची ही भजी पार्टी जोरात झाली.