|Monday, December 9, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘जिवलगा’च्या टीमचे ‘बॉटल पॅप चॅलेंज’

‘जिवलगा’च्या टीमचे ‘बॉटल पॅप चॅलेंज’ 

सोशल मीडियावर सध्या बॉटल पॅप चॅलेंजची क्रेझ पाहायला मिळतेय. पायाने पहिल्याच प्रयत्नात बाटलीचे झाकण उडवायचे असे काहीसे हे चॅलेंज आहे. ऐकायला जरी हे सोपे वाटत असले तरी करायला मात्र ते तितकेच अवघड आहे. बॉलीवूडच्या अनेक मंडळींनी हे चॅलेंज स्वीकारलेय. ‘स्टार प्रवाह’वरील ‘जिवलगा’ मालिकेतील कलाकारांनीही हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

‘जिवलगा’ मालिकेतील काव्या म्हणजेच अमफता खानविलकरने हे चॅलेंज एका फटक्यात पूर्ण केले तर तिकडे निखिल आणि विश्वास म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर आणि स्वप्निल जोशीने अनोख्या ढंगात हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ‘जिवलगा’ मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर हे व्हिडिओज पोस्ट केले असून नेटिझन्सनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

Related posts: