|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Top News » डीएसकेंकडे आणखी 25 मालमत्ता

डीएसकेंकडे आणखी 25 मालमत्ता 

पुणे / वार्ताहर  : 

ठेवीदारांची कोटय़वधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेले बांधकाम व्यावासायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या शहराच्या वेगवेगळय़ा भागात आणखी 25 मालमत्ता आढळून आल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून या मालमत्तांची यादी उपजिल्हाधिकाऱयांकडे सादर करण्यात आली आहे.

या प्रकणात सक्त वसुली अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने न्यायालयाच्या परवानगीनंतर कुलकर्णी यांची चौकशी केली होती. कुलकर्णी यांच्या परदेशात मालमत्ता असल्याचे आढळून आले होते. कुलकर्णी यांच्या पुणे शहरात आणखी काही मालमत्ता असल्याची माहिती तपासात मिळाली होती. धायरी भागात त्यांच्या 12 मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. पिरंगुट, बाणेर, बावधन, बालेवाडी, किरकटवाडी भागात त्यांच्या मालमत्ता असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. या जागांची किंमत बाजारभावानुसार तीनशे ते साडेतीनशे कोटी रूपये असण्याची शक्यता आहे. तपासात नवीन मालमत्तांचा शोध लागल्यामुळे त्याच्या विक्रीतून ठेवीदार तसेच बँकांना पैसे परत करणे शक्यता होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.