|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Top News » तिवरे धरणफुटी : मंत्र्याच्या घराबाहेर खेकडे फेकले

तिवरे धरणफुटी : मंत्र्याच्या घराबाहेर खेकडे फेकले 

 

पुणे /वार्ताहर :

जलसंधरण मंत्री तानाजी सावंत यांच्या घराबाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेकडे फेकले. रत्नागिरीतील तिवरे धरणफुटी खेकडय़ांमुळे झाल्याचं वक्तव्य सावंत यांनी केलं होतं. त्याचा निषेध करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या घराबाहेर खेकडे फेकले.