|Sunday, October 20, 2019
You are here: Home » उद्योग » रेडमी के 20-के20 प्रो 17 जुलैला होणार भारतात सादर

रेडमी के 20-के20 प्रो 17 जुलैला होणार भारतात सादर 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतात चालू महिन्यात शाओमी आणि सॅमसंग कंपनीकडून 48 एमपी क्षमता असणाऱया ट्रिपल कॅमेरा फोन्सचे सादरीकरण करण्यात येणार आहे. परंतु सॅमसंग गॅलेक्सी ए80 च्या सादरीकरणा पूर्वीच शाओमी आपला स्मार्टफोन के20 आणि के20 प्रो भारतात येत्या 17 जुलैरोजी दाखल करणार आहे. सदरच्या स्मार्टफोनची सविस्तर माहिती फ्लिपकार्टवर उपलब्ध करुन दिली आहे. सोबत टीजरही लाँच केला आहे. त्यात स्मार्टफोन्सचे काही फिचर्स संदर्भात माहिती दिली आहे.

के20 प्रो

सदरच्या स्मार्टफोनला 6.39 इंचाची डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रगन 855 फ्रन्ट कॅमेरा 20 मेगापिक्सल रियर कॅमेरा 48 मेगापिक्सल +8 मेगापिक्सल+13 मेगापिक्सल आणि रॅम 6 जीबी तर स्टोरेज 64 जीबी आणि बॅटरी 4000 क्षमता असणारी मिळणार आहे.

किमत

रेडमी के20 चे स्मार्टफोन स्नॅपडॅनन 730 कमी दरात 18 ते 20 हजार रुपयापर्यत सादरीकरणा वेळी उपलब्ध करुन दिला जाणार आहे तर के20 प्रो हा30 हजार रुपयापर्यत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.