|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Top News » जेष्ठ वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्या घरावर छापे

जेष्ठ वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्या घरावर छापे 

 

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली  : 

सर्वोच्च न्यायालयाच्या जेष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांच्या मुंबई आणि दिल्लीतील निवासस्थानावर सीबीआयने गुरूवारी सकाळी छापे टाकले. ‘लॉयर्स कलेक्टव्हि’ या संस्थेच्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीत अनियमितता असल्याचा या दोघांवरही आरोप ठेवण्यात आला असून त्यापार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

आनंद ग्रोव्हर आणि इंदिरा जयसिंग हे दोघेही लॉयर्स केलक्टव्हि नावाची संस्था चालवतात. इंदिरा जयसिंग या 2009 ते 2014 या कालावधीत एडिशनल सॉलिसिटर जनरल या पदावर कार्यरत होत्या. या कालावधीत लॉयर्स कलेक्टव्हि या संस्थेसाठी त्यांनी इतर देशांमधून निधी गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच त्यांनी या निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही लॉयर्स कलेक्टव्हि विरोधत करण्यात आलेल्या याचिकेत आहे.