|Saturday, October 19, 2019
You are here: Home » leadingnews » सरकारने शेतकऱयांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत : राहुल गांधी

सरकारने शेतकऱयांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत : राहुल गांधी 

 

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली : 

शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. नुकतीच वायनाडमधील एका शेतकऱयाने आत्महत्या केली. तसेच वायनाडमधील 8 हजार शेतकऱयांना कर्जाची रक्कम न भरल्याचे सांगत बँकेने नोटीस पाठवली. तसेच अनेकांच्या जमिनी जप्त करण्यात आल्यामुळे शेतकऱयांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. यावेळच्या अर्थसंकल्पात शेतकऱयांच्या विकासाच्या दृष्टीने कोणतेच ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर हल्ला चढवला.

राहुल गांधी म्हणाले की, देशातील शेतकऱयांच्या समोर अनेक समस्या आहेत. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. केरळमध्ये बँकांनी सुरू केलेल्या कारवाईनंतर गेल्या दीड वर्षांमध्ये 18 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच शेतकऱयांना केरळ सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा पोहोचवण्यातही अडथळा निर्माण होत आहे.