|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Top News » निवृत्तीचा विचार मनातही आणू नकोस धोनी : लता मंगेशकर

निवृत्तीचा विचार मनातही आणू नकोस धोनी : लता मंगेशकर 

 

ऑनलाइन टीम /मुंबई : 

विश्वचषक सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधर महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. या चर्चेत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ही सहभाग घेत, लतादीदींनी धोनीला निवृत्त न होण्याची विनंती केली आहे. निवृत्त होण्याचा विचारही मनात आणू नकोस, असा सल्लाही लतादीदेंनी धोनीला दिला आहे.

लता दीदींनी एक ट्विट करून धोनीला हा सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या, धोनी तू निवृत्त होणार असल्याचं मी ऐकलंय. कृपया करून असा विचार मनात आणू नकोस. देशाला तुझ्या खेळाची गरज आहे. त्यामुळे तू निवृत्त होण्याचा विचार मनातून काढून टाक. माझीही तुला व्यक्तिगत विनंती आहे.