|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कळंब्यात ‘डेंग्यू’ नियंत्रण बैठकीत मार्गदर्शन

कळंब्यात ‘डेंग्यू’ नियंत्रण बैठकीत मार्गदर्शन 

कळंबा /वार्ताहर :
करवीर तालुक्यातील कळंबा येथे डेंग्यूच्या साथीने उग्र रूप धारण केले आहे. शंभर पेक्षा अधिक नागरीक डेंग्यूच्या विळख्यात सापडले असून, ते विविध खाजगी आणि सरकारी रूग्णालयात उपचार घेत आहेत. डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाची तातडीची बैठक कळंबा येथे घेण्यात आली.
करवीर तालुक्यातील कळंबा येथे गेले 15 दिवस डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. यात एका महिलेचाही मृत्यूही झाला आहे. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपाय योजना करूनही डेंग्यूची साथ आटोक्यात आलेली नाही. यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने कळंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, गट विकास अधिकारी सचिन घाटगे यांनी आरोग्य कर्मचार्यांना डेंग्यूविषयी घ्यावयाची खबरदारी आणि उपाय योजनेबाबत मार्गदर्शन केले.
बैठकीला कळंबा गावचे सरपंच सागर भोगम, ग्रामसेवक व्ही. डी. राबाडे, भगवान पाटील, अरुण टोपकर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान कळंबा गावातील नागरीकांकडे विना वापर पडून असणाऱया टायरीमध्ये पाणी साचून, डेंग्यूच्या अळ्यांची पैदास हेते. त्यामुळे नागरीकांकडे असणाऱया 500 पेक्षा अधिक टायरी कळंबा ग्रामपंचायतीने ताब्यात घेतल्या आहेत.