|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ताराबाई पार्क एस.टी.वर्कशॉपमध्ये अस्वच्छता

ताराबाई पार्क एस.टी.वर्कशॉपमध्ये अस्वच्छता 

प्रतिनिधी/कोल्हापूर :

ताराबाई पार्कातील एस.टी.च्या वर्कशॉपमध्ये टायर,टय़ुब इतस्त: पडल्या आहेत. सफाईअभावी वर्कशॉपमध्ये अस्वच्छता पसरली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांच्यासमवेत वर्कशॉपची पाहणी संबंधित अधिकाऱयांना स्वच्छता ठेवण्याबाबत बजावले.

एस.टी. वर्कशॉपमध्ये मोठया प्रमाणात कचरा साचला आहे. येथील सफाई वेळच्यावेळी होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टायरी,टय़ुब उघडय़ावर पडल्या असून पावसाचे पाणी त्यामध्ये साठून डासांची व्युत्पत्ती होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांना घेऊन वर्कशॉपची पाहणी केली. यावेळी एस.टी.चे एमओयू रॉड्रिक्स उपस्थित होते. उघडय़ावर पडलेल्या टायर, टय़ुब तसेच भंगार काढून घेण्याचे आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली.  यावेळी वर्कशॉपमधील चार सफाई कर्मचारी एकाचवेळी गैरहजर असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. एमओयू रॉड्रिक्स यांनी वर्कशॉपमध्ये स्वच्छता राखण्याचे आश्वासन दिले.