|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खड्डय़ात गेला सातारा

खड्डय़ात गेला सातारा 

प्रतिनिधी/ सातारा :

उरात होतीया धडधड…रस्त्यांची लागली वाट…सातारा गेलाय खड्डय़ात..पोवई नाक्यावरचा त्यो डबरा…जिल्हा परिषदेच्या चौकातला ह्यो डबरा…मोडलयं कंबरट सारं…सातारा गेलाय खड्डय़ात..सातारा गेलाय खड्डय़ात, असच मुंबईच्या आरजे मलिष्कान सातारा शहरात पडलेल्या खडय़ात विडंबनात्मक गाणे करु नये म्हणजे झालं. तीने मुंबईच्या खड्डय़ावर दोन वर्षापूर्वी असंच गाण केलं आणि त्यावरुन तिच्यावर टीकाटीप्पणीही झाली.तिचा हेतू वाईट नव्हत. रस्त्याला पडलेलं खड्डे प्रशासनाला दाखवणे हा होता. साताऱयात गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे खड्डय़ात शहर गेल्याचाच प्रत्यय प्रत्येक सातारकरांना येवू लागला आहे.

सातारा शहरात चार वर्षापूर्वीही अशी सर्व रस्त्यांची चाळण झाली होती. मीडियाने जेव्हा रस्त्यावर मालिका लिहिल्यानंतर लोकप्रतिनिधींनी मनावर घेवून रस्त्यांची कामे केली होती. सध्या सातारा शहरात ग्रेड सेपरेटर, भुयारी गटर अशी सर्वच कामे सुरुच आहेत. त्यामुळे मुळातच खड्डेमय असलेले रस्ते आणखी खड्डेमय झाले आहेत. त्या रस्त्यांची खरी अवस्था सुरु असलेल्या पावसामुळे सातारकरांना अनुभवायला मिळत आहे. सातारकरांना नक्कीच या खडय़ामुळे पाठीच्या दुखण्याबरोबरच इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच वाहनांमध्ये दोष निर्माण होवू लागले आहेत. पडलेल्या खड्डय़ात पाणी साचल्याने सातारा खरोखरच खडय़ात गेल्याचेच चित्र निर्माण झाले आहे.