|Sunday, October 20, 2019
You are here: Home » उद्योग » फोर्ब्सच्या पहिल्या 100 मध्ये अक्षय कुमारची वर्णी

फोर्ब्सच्या पहिल्या 100 मध्ये अक्षय कुमारची वर्णी 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

फोर्ब्सने जगभरातील सर्वाधिक नफा करणाऱया सेलिबेटीची यादी नुकतीच सादर केली आहे. सदरच्या यादीत भारतामधील फक्त अभिनेते अक्षय कुमार यांची वर्णी लागली आहे.

 सर्वाधिक नफा कमाईच्या 2019 मधील यादीत अक्षय कुमारचा 33 व्या नंबर लागला असून त्यांची कमाई 6.5 कोटी डॉलर्स(444 कोटी रुपये) झाली आहे. मागील एका वर्षात त्याने एका चित्रपटासाठी 34 कोटी रुपयावरुन 68 कोटी रुपये घेतले होते. 2018 च्या यादीत अक्षय कुमारचा 76 व्या स्थानी वर्णी लागत त्याने 270 कोटी रुपयाची कमाई केल्याची नोंद होती.

शाहरुखचा सलग दुसऱयादा पत्ता कट

सलमान खान यावेळी फोर्ब्सच्या यादी बाहेर पडले आहेत. तर मागील वर्षात 3.77 कोटी डॉलर(257 कोटी रुपये)च्या कमाई सोबतच त्याचा 82 वा क्रमाक लागला होता. दुसऱया बाजूला शाहरुखचा मात्र सलग दुसऱयादा पत्ता कट झाला असून तो  2017 मध्ये 65 व्या स्थानी राहिला होता.

फोर्ब्सच्या 2019 च्या सेलिबेटी कमाईच्या यादीत अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट सर्वोच्च स्थानावर राहिली आहे. दुसऱया स्थानी कायलीकॉस्मेटिक्सची कायली जेनर आणि तिसऱया स्थानी कान्ये वेस्ट यांचा समावेश आहे.