|Sunday, October 20, 2019
You are here: Home » उद्योग » ‘विस्तारा’चे आंतरराष्ट्रीय उड्डाण

‘विस्तारा’चे आंतरराष्ट्रीय उड्डाण 

नवी दिल्ली :

 ‘विस्तारा’ एअरलाइन्सकडून विमान प्रवाशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करणार असल्याची माहिती गुरुवारी दिली आहे. येत्या ऑगस्टमध्ये दिल्ली-सिंगापूर, मुंबई-सिंगापूर अशी नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा चालू करण्यात येणार आहे. सिंगापूर एअरलाइन्ससोबत टाटा गुप विस्तारा एअरलाइन्सला ही चालवत आहे.

 नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणामध्ये दिल्ली-सिंगापूर अशी नियमीतपणे दोन उड्डाणे सुरु होणार आहेत. तर ही विमानसेवा येत्या 6  व 7 ऑगस्टला सुरु होणार आहे. लवकरच अन्य आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

दोन वर्गासाठी सेवा उपलब्ध

या सेवेत 737-800 एनजी विमान असणार आहे. तर यामध्ये दोन वर्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. एक व्यावसायिक आणि इकोनॉमिक वर्गातील  सिट्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. आगामी काळात हीच सेवा एका आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विस्ताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेसली थंग यांनी यावेळी म्हटले आहे.