|Friday, October 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » रात्रभर ट्विटर सेवा ठप्प, युजर्स वैतागले

रात्रभर ट्विटर सेवा ठप्प, युजर्स वैतागले 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काल रात्रभर ट्विटर सेवा ठप्प झाल्याने जगभरातील ट्विटर यूजर्सने नाराजी व्यक्त केली आहे. आज पहाटे 5 च्या सुमारास ट्विटर सेवा सुरू झाली.

रात्रभर ट्विटर सेवा ठप्प झाल्यावर काही यूजर्सनी ट्विटर बंद झाल्याचे मीम्सही व्हायरल केले. आज पहाटे ट्विटर सेवा पूर्ववत झाली. दरम्यान, ट्विटर अकाउंट सुरू झाल्यानंतरही लोकांनी प्रश्नांचा भडिमार सुरु केला. त्यानंतर कंपनीचे सीईओ जॅक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘ट्वटिर अकाउंट डाऊन झाले होते. मात्र, हळूहळू ट्विटर सेवा पूर्वपदावर येत आहे. त्याबद्दल दिलगीर आहोत,’ असे ट्विट केले आहे. कोणत्या कारणामुळे ट्विटर डाऊन झाले होते, याची माहिती ट्विटरकडून देण्यात आली नाही.