|Friday, November 15, 2019
You are here: Home » उद्योग » टेक्नो फॅटम -9 स्मार्टफोन भारतात लाँच

टेक्नो फॅटम -9 स्मार्टफोन भारतात लाँच 

14,999 रुपये किंमत : सेन्सरसह अन्य अत्याधुनिक सुविधा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हॉगकॉग येथील असणारा स्मार्टफोन ब्रॅण्ड टेक्नो मोबाईलकडून भारतात टेक्नो फॅटम-9चे सादरीकरण केलेले आहे. टेक्नो फॅटम-9 मध्ये ट्रिपल कॅमेऱयाचा सेटअप आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिन्ट सेंसरची लेस सुविधा देण्यात आलेली आहे. या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवरती 17 जुलैपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य परिचलन अधिकारी मार्को मा यांनी म्हटले आहे. 

आगामी विस्तार

भारत दक्षिण आशिया क्षेत्रासाठी समग्र  विस्तार योजनेच्या रुपाने एक बाजार आहे. तो आमच्यासाठी प्राथमिक पातळीवरील बाजार असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर एच-2 वर आम्ही लक्ष्य केंद्रीत केले असून भारतामध्ये वैश्विक पोर्टफोलियोचा विस्तार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे स्पष्टीकरण यावेळी दिले आहे.

फॅटम-9 ची किंमत

भारतात टेक्नो फॅटम-9मध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएन्टची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर टेक्नो फॅटम-9 हा स्मार्टफोन लॅपलॅन्ड ऑरोरा वेरिएन्टमध्ये उतरला आहे.

फॅटम-9 चे वेगळेपण

डब्बल सेल्फि फ्लॅश 32 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेऱयासह डॉट नॉच डिस्प्ले

एचआय एचडीआर, एआय सीन डिटेक्शन व ब्लॅकलाईट पोर्टेट आदि प्रीलोड फिचर्सची सोय 

फोनमध्ये एक इन-डिस्प्ले फिंगप्रिन्ट सेंसरसह आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व फेसलॉकचा पर्याय देण्यात आला आहे.

टेक्नोच्या विक्रीसाठी फ्लिपकार्टसोबत भागिदारी

Related posts: