|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पावसामुळे भुईबावडा घाटात पडझड

पावसामुळे भुईबावडा घाटात पडझड 

वैभववाडी :

तालुक्मयात गेले चार-पाच दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे भुईबावडा घाटात पडझड झाली आहे. दोन ठिकाणी दरडी गटारात कोसळल्यामुळे पाणी रस्त्यावर येऊन चिखल झाला आहे. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, राजापूर-पाचल ते मलकापूर जाणाऱया रस्त्यावरील अणुस्कूरा घाटात दरड कोसळल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे.

 

Related posts: