|Monday, February 17, 2020
You are here: Home » क्रिडा » खराब पंचगिरीचा पुन्हा एकदा फटका

खराब पंचगिरीचा पुन्हा एकदा फटका 

जेसन रॉयला कापले अन् दंडही ठोठावला

गुरुवारी विश्वचषक स्पर्धेतील दुसऱया उपांत्य सामन्यात इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला नमवत अंतिम फेरी गाठली. मात्र, बर्मिंगहॅम या मैदानावर पुन्हा एकदा खराब पंचगिरीचा फटका इंग्लंडचा स्टार खेळाडू व सलामीवीर जेसन रॉयला बसला. इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावलेल्या रॉयला पंच कुमार धर्मसेना यांनी चुकीच्या पद्धतीने झेलबाद दिले. यानंतर पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धेतील खराब पंचगिरी समोर आली आहे.

  ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर 85 धावांवर असताना जेसन रॉय पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर यष्टीमागे फटका मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र हा त्याचा प्रयत्न फसला व चेंडू यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरेकडे गेला. प्रत्यक्षात चेंडू व बॅटमध्ये बरेच अंतर असताना पॅट कमिन्सने पंच कुमार धर्मसेना यांच्याकडे अपील केले व धर्मसेना यांनी त्याला लगेच बादही दिली. यानंतर धर्मसेना यांच्या निर्णयामुळे रॉय चांगलाच आश्चर्यचकित झाला. त्याने मैदानात पंचाशी हुज्जत घालत आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आयसीसीच्या नियमानुसार पंचाशी हुज्जत घातल्यामुळे त्याच्या सामन्याच्या मानधनातील 30 टक्के रक्कम कापण्यात आली आहे. पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी रॉयवर बंदीची कारवाई केली जाऊ शकत होती पण रॉयने आपली शिक्षा मान्य केल्यामुळे केवळ सामन्याची रक्कम कापण्यात आली आहे.

 पंच कुमार धर्मसेना यांच्या चुकीच्या निर्णयामुळे यंदाच्या विश्वचषकातील पंचाच्या खराब कामगिरीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आयसीसीने यामध्ये लक्ष्य घालण्याची गरज असल्याचे ईसीबीन म्हटले आहे.

 

Related posts: