|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » बनावट बंदूक ठरली मृत्यूस कारणीभूत

बनावट बंदूक ठरली मृत्यूस कारणीभूत 

पोलिस अधिकाऱयाने मुलीवर झाडली गोळी

वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस 

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एका पोलीस अधिकाऱयाने 17 वर्षीय हन्ना विलियम्स हिच्यावर गोळय़ा झाडल्या आहेत. हन्नाने पोलीस अधिकाऱयावर बनावट बंदूक डागली होती. खरी बंदूक वाटल्यामुळे अधिकाऱयाने गोळी झाडल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेशी संबंधित चित्रफित शुक्रवारी फुलर्टन पोलीस विभागाने प्रसिद्ध केली आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

 ही घटना 5 जुलै रोजी घडली असून पोलिसांनी कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे. चित्रफितीत हन्नाच्या हातात बनावट बंदूक दिसून येते. पोलिसांनी एक ध्वनिफित प्रसारित केली असून हन्नाचे वडिल बेन्सन विलियम्स स्वतःच्या बेपत्ता मुलीबद्दल बोलत असल्याचे यात ऐकू येते.

नैराश्यग्रस्त हन्ना स्वतःला नुकसान पोहोचवेल  अशी भीती बेन्सन यांना सतावत होती. दुर्घटनेदरम्यान उपस्थित अधिकाऱयाशी बोलल्यानंतर नव्या गोष्टी समोर आल्या आहेत.

हन्ना अत्यंत वेगाने वाहन चालवत होती. ती स्वतःच्या श्वानाला रुग्णालयात नेत होती. पण तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता तिने नकार दिला. हन्नाने यू-टर्न घेत कार दुसऱया दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. कार रोखण्यास यश मिळाले असता तिने बंदूक रोखल्याने आम्हाला तिच्यावर गोळी झाडावी लागली. पण तपासणीत ती बंदूक बनावट असल्याचे समजले, असे पोलीस अधिकाऱयाने सांगितले आहे.

Related posts: