|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » चंद्रभागेच्या पैलतीरी होणार नामदेव स्मारक : जिल्हाधिकारी

चंद्रभागेच्या पैलतीरी होणार नामदेव स्मारक : जिल्हाधिकारी 

स्मारकासाठी पंजाब सरकार व तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ातून 15 कोटींची तरतूद

प्रतिनिधी /  पंढरपूर

 वर्षभरामध्ये नामदेव स्मारकाचा देखिल प्रश्न मार्गी लागणार आहे. चंद्रभागेच्या पैलतीरावर असणाऱया 65 एकर परिसरामध्ये नामदेव स्मारक उभा केले जाणार आहे. यासाठी पंजाब सरकार तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ातून 15 कोटी रूपयांची तरतूद आहे. तसेच हे स्मारक उभा करताना याचा वारी काळात देखिल उपयोग व्हावा. यादृष्टीने या स्मारकाचे नियोजन हे केले जाणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली. 

येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार मधुसुदन बर्गे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके आदी याप्रसंगी उपस्थित होते.

प्रसंगी पुढे जिल्हाधिकारी डॉ.भोसले म्हणाले, नामदेव स्मारकासाठी पूर्वीची एक जागा नियोजित होती. मात्र ही जागा अडचणीची आहे. त्यामुळे या जागेवर स्मारक न उभा करता. 65 एकर परिसरात नामदेव स्मारक उभा करण्यात येणार असल्याचे देखिल यावेळी त्यांनी सांगितले. 

 आषाढी यात्रेचे नियोजन हे वारकरी सांप्रदायातील विश्वस्त तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱयांमुळे योग्य झाले. त्यामुळे प्रशासकीय नियोजनाबद्दल अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केले. तसेच यावर्षीच्या नियोजनाचा अधिक अभ्यास करीत आणि अधिकाऱयांकडून आढावा घेऊन पुढील वर्षीचे अधिक चांगले नियोजन हे केले जाणार आहे.

 याचबरोबरीने पंढरीत केवळ वारीसाठी नव्हे तर धार्मिक पर्यटनवाढीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना आगामी काळात केल्या जाणार आहेत. याबाबत प्रशासन हे सकारात्मक आहे. असे मत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केले.

चौकटित –

  लवकरच स्वच्छता अभियान..

 आषाढी यात्रेपूर्वी जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. त्यानंतर आता परत एकदा वारीनंतर पौर्णिमा झाल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनास मदत करणाऱया स्वयंसेवी संस्था तसेच सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱया अधिकाऱयांचा देखिल सन्मान करण्यात येणार असल्याचे देखिल जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.

Related posts: